3 दिवस बाजारपेठ राहणार बंद
बीड : गेवराईत ‘भिलवाडा पॅटर्न’च्या धर्तीवर अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. पहिल्याच दिवशी त्याठिकाणी 28 व्यापार्यांसह विक्रेते पॉझिटिव्ह आढळून आहे. त्यामुळे संभाव्य धोका टळला. त्याच धर्तीवर आता व्यापार्यांसह किरकोळ विक्रेत्यांच्या ‘अँटीजेन टेस्ट’ दि.8, 9 व 10 ऑगस्ट रोजी बीड शहरात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी एका आदेशाद्वारे जाहीर केले आहे.
जिल्हाधिकार्यांनी आदेशात म्हटले आहे की, सदरील अँटीजेन टेस्ट शहरातील फळविक्रेते, दूध विक्रेते, पेट्रोल पंपावरील कर्मचारी, बँकांचे कर्मचारी, किराणा दुकानावरील कर्मचारी, कापड दुकानावरील कर्मचारी, सराफा दुकानावरील कर्मवाची व इतर सर्व प्रकारच्या दुकानावरील कर्मचार्यांना टेस्ट करण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे दि.8, 9 व 10 रोजी शहरातील संपूर्ण व्यापार बंद राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. अँटीजेन टेस्टनंतरच दुकानदारांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे बीड शहरातील सर्व प्रकारच्या व्यापार्यांनी खालील ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
