arrested criminal corona positive

घरफोडीच्या गुन्ह्यातील तीन आरोपी मुद्देमालासह जेरबंद

आष्टी क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

आष्टी पोलीसांची कारवाई

बीड  : चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यातील तीन सराईत आरोपी आष्टी पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतली आहेत. त्यांच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. 

      आष्टी येथील कणसेवाडी येथे चोरीची घटना घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील आरोपी नाज्या उर्फ सोमीनाथ दिलीप उर्फ नेहर्‍या काळे यास पोलीसांनी 20 जून रोजी ताब्यात घेतले होते. त्याकडून गुन्हयातील चांदीच्या साखळया 3 नग किंमत तीन हजार रुपये, एक दोन ग्रॅमची सोन्याची नथ, किंमत 6400 असा मुद्देमाल जप्त केला होता. यातील आरोपी संदीप ईश्वर भोसले (रा.बेलगाव) यास 6 ऑगस्ट रोजी पाठलाग करुन पकडले. तसेच तिसरा आरोपी सोन्या ईश्वर भोसले (रा.बेलगांव) यासही पोलीसांना पकडण्यात यश आले. यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उप अधीक्षक विजय लगारे, आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.यादव, कांबळे, पोना.क्षीरसागर, सुंबरे, गायकवाड, शिकेतोड, करंजकर, तवले, गुजर, अडागळे, चालक गोरे यांनी केली.

तिघेही सराईत गुन्हेगार
सदरील आरोपींवर अहमदनगर, बीड, सोलापूरसह आदी जिल्ह्यामध्ये चोरी, जबरी चोरी, दरोडा, घरफोडी अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांची चौकशी सुरु असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Tagged