माजलगाव : माजलगाव शहरात सुरु झालेल्या व्यापार्यांच्या अॅन्टीजेन टेस्टमध्ये 31 व्यापारी आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळले आहेत. 678 जणांच्या तपासणी दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आल्या. त्यात हे रुग्ण आढळल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल परदेशी यांनी सांगितले.
कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील व्यापार्यांची अॅन्टीजेन तपासणी करण्यात आली. शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय, छत्रपती शिवाजी विद्यालय, सिद्धेश्वर विद्यालय, गणपती मंदिर, नवीन बस स्टॅन्ड परिसर, सोळंके महाविद्यालय या सहा केंद्रावर सकाळी दहा वाजता तपासणीला सुरुवात करण्यात आली. दरम्यान या तपासणीत दुपारी 1 वाजेपर्यंत 687 व्यापार्यांची तपासणी पूर्ण झाली असून यात 31 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल परदेशी यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली.
