ambajogai CORONA

अंबाजोगाई : 20 व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह

अंबाजोगाई कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येत आलेल्या अँटिजन टेस्टचा antigen test प्रारंभ सकाळी आठ वाजता झाला. 12 बारा वाजेपर्यंत व्यापार्‍यांसह विक्रेते असे एकूण 20 जण कोरोना पॉझिटिव्ह corona positive आले आहेत. तालुका आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

   रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, rotory club of ambajogai city भारतीय जैन संघटना, नगर परिषद व महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्यावतीने खोलेश्वर विद्यालय, वेणूताई चव्हाण कन्या विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, शिवाजी चौक. योगेश्वरी शाळा मंदिर विभाग या ठिकाणी अँटिजन टेस्ट करण्यात येत आहेत. सुरुवातीस अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, तहसीलदार संतोष रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब लोमटे, पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, नगर परिषदेचे स्वछता निरीक्षक अनंत वेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात चार ठिकाणी एकाच वेळी अँटीजन टेस्टला सुरुवात करण्यात आली. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.निशिकांत पाचेगावकर, सचिव कल्याण काळे, भारतीय जैन संघटनेचे धनराज सोळंकी, निलेश मुथा यांच्यासह रोटरी क्लब, भारतीय जैन संघटना, शासकीय कर्मचारी प्रत्येक बुथवर दक्षता घेत यंत्रणा राबवत आहेत. शहरात ज्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन आहेत. तेथील रहिवाशी व नोंदणी केलेले व्यापारी यांच्यासाठी योगेशवरी प्राथमिक शाळा व डॉ.आंबेडकर वसतिगृह येथे दोन स्वतंत्र बुथ स्थापन केले असून नगर परिषदेच्या वाहनातून बुथपर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

READ E PAPER KARYARAMBH

Tagged