antigen test swab

बीड जिल्हा : अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये सलग दुसर्‍या दिवशी 230 व्यापारी पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि.19 : जिल्ह्यातील पाच शहरात कालपासून सुरु असलेल्या व्यापार्‍यांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये आज पुन्हा 230 इतके व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कालच 212 व्यापारी या पाच शहरात आढळून आले होते.

अंबाजोगाई, आष्टी, केज, माजलगाव, परळीत 18, 19 आणि 20 ऑगस्टपर्यंत व्यापारी व इतर सर्व व्यावसायिकांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्याचं नियोजन जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे. त्यात 19 ऑगस्ट रोजी अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 230 इतके पॉझिटिव्ह आढळून आले.
परळीत सावळा गोंधळ
आज परळीत व्यापार्‍यांना अ‍ॅन्टीजेन टेस्टसाठी 2 ते 4 तास वेटींग करावी लागली. अ‍ॅन्टीजेन टेस्टचे रिपोर्ट अर्ध्या तासात मिळत असताना परळीतील व्यापार्‍यांना मात्र वाट पहावी लागली. पंचायत समिती व सरस्वती विद्यालयाच्या सेंटरवर मुबलक किट नव्हत्या तर बसस्थानकावरील केंद्रात नोंदणी रजिस्टर संपल्यामुळे काहीवेळ ही प्रक्रीया थांबविण्यात आली होती.

दि. 19 ऑगस्ट रोजी शहरनिहाय केलेल्या अ‍ॅन्टीजेन तपासण्या आणि पॉझिटिव्ह
अंबाजोगाई- ——2091 ——- 46
आष्टी——–600 —————– 33
केज – ——-607—————— 17
माजलगाव ————859——– 29
परळी ———2032 ————- 105
एकूण ——–6189 ————— 230

दि. 18 ऑगस्ट रोजी शहरनिहाय केलेल्या अ‍ॅन्टीजेन तपासण्या आणि पॉझिटिव्ह
अंबाजोगाई—–1696 ——— 37
आष्टी—–630 ——————-17
केज——697——————--20
माजलगाव—-1425 ————71
परळी —–1321—————- 67
एकूण— 5769—————–
212

बीड जिल्ह्याची 19 ऑगस्ट दुपारी 3 पर्यंतची कोरोना अपडेट
एकूण रुग्ण- 2972
कोरोना मुक्त 1665
एकूण मृत्यू- 76
उपचार सुरु- 1231

मृत्यूचा आकडा 76 तर 225 जणांना सुटी
जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त आकडेवारीनुसार बुधवार दिनांक 19 ऑगस्ट दुपारपर्यंत मृतांचा आकडा 76 वर जाऊन पोहोचला होता. तर आज नव्याने 225 जणांना रुग्णालयातून व कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तालुकानिहाय उपचार सुरु असलेले रुग्ण पुढीलप्रमाणे
बीड – 377
आष्टी – 79
पाटोदा – 12
शिरूर – 30
गेवराई – 64
माजलगाव – 181
वडवणी – 22
धारूर – 48
केज – 128
अंबाजोगाई – 102
परळी – 188

एकूण- 1231

आतापर्यंतचे तालुकानिहाय मृत्यू
बीड – 19
आष्टी – 5
पाटोदा – 3
शिरूर – 1
गेवराई – 10
माजलगाव – 4
वडवणी – 2
धारूर – 2
केज – 8
अंबाजोगाई – 9
परळी – 13

Tagged