chori, gharfodi

आष्टी येथील जैन मंदिरात चोरी

आष्टी क्राईम

आष्टी, दि.19 : येथील श्री चंद्रप्रभु दिंगबर जैन मंदिरात बुधवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास चोरी झाली असून यामध्ये पितळाच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या असल्याची लेखी तक्रार जैन संघटनेचे अध्यक्ष सुनील पंढरे यांनी येथील ठाण्यात दिली.
शहरातील तेली गल्ली लगत असलेल्या जैन मंदिरात साडे चारशे वर्षापूर्वीची भगवान महावीर यांची पितळेची ऐतिहासिक मुर्ती होती. हीच मुर्ती चोरी गेली असून याचबरोबर पितळी मानसस्तंभ, श्री पार्श्वनाथ भगवान मुर्ती, पद्मावतीच्या 2 मुर्ती व महावीर स्वामींची स्पटिकाची मुर्ती चोरीला गेली असल्याचे ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक लगारे, पोलीस निरीक्षक बडे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस नाईक उभाळे हे करीत आहेत.

Tagged