वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान

न्यूज ऑफ द डे शिरूर

पंचनामे करुन भरपाईची शेतकर्‍यांची मागणी

शिरुर  : सोमवारी रात्री शिरुर तालुक्यातील हिवरसिंगा, फुलसांगवी, तिंतरवणी, जोडवाडी, खालापुरी, जाटनांदुरसह परीसरामध्ये वादळी वार्यासह मुसळधार पाउस पडला. यामध्ये शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. उस, कापुस काढणीला आलेली बाजरी, तूर तर काढुन ठेवलेला उडीद, मुग बाजरीचे कणीस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

      यावर्षी खरीप हंगामामध्ये ऐन वेळेवर पाऊस पडल्यामुळे शेतकर्यांनी खरीपाची लागवड चांगल्या प्रकारे केली. योग्य वेळी लागवड झाल्याने पिके ही जोमात आली. पण राञी पडलेल्या वादळी वार्‍यासह पावसाने पिकांचे होत्याचे नव्हते झाले. हिवरसिंगासह परीसरात ऊस, तुर, बाजरी, कापुस या पिंकाचे नुकसान झाले आहे. जाटनांदुरसह परीसरात बाजरी, कापुसह आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तिंतरवणी परीसरात दोन दिवसापुर्वी पडलेल्या पावासाने पिंकाचे नुकसान झाले आहे. शिरुर तालुका हा तसा मागासलेला तालुका आहे. या तालुक्याला पाऊस पडला तरच पाणी नाहीतर सततचा दुष्काळ त्यामुळे येथील लोक सर्वात जास्त उसतोडणीसाठी बाहेर जातात. तर काही मुंबई, पुणे या ठिकाणी खाजगी कंपन्यात नौकरी करतात. अजुनही शिरुर तालुक्याला म्हणावे तसी मोठी बाजार पेठ नाही. त्यामुळे येथील शेतकरी हे शेतीवरच अवलंबुन आसतात. कधी सततचा कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ दोन्हीतून वाचले तर पिकाला भाव नसतो. यावरुन शेतकरी नेहमीच संकटात सापडलेला असतो. त्यामुळे शेतकरी राजा मेटाकुटीला आला आहे. शासनाने पिकांचे तात्काळ पंचानामे करुन शेतकर्‍यांना मदत जाहिर करुन दिलासा द्यावा अशी मागणी रोकडेश्वर येथील शेतकरी कृष्णा देवगुडे यांनी केली आहे.

Tagged