राज्यसभेतील गोंधळी खासदार निलंबित

न्यूज ऑफ द डे राजकारण

नवी दिल्ली : कृषी विधेयकाच्या विरोधात गोंधळ घालणार्‍या आठ खासदारांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजात आता सहभागी होता येणार नाही. त्यांचं आठ दिवसासाठी निलंबन करण्यात आले.

संजय सिंह (आम आदमी पक्ष), राजीव सातव (काँग्रेस), डेरेक ओ ब्रायन (तृणमूल काँग्रेस), के के रगेश (माकप), सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस) रिपुन बोरा (काँग्रेस) डोला सेन (तृणमूल काँग्रेस आणि एलामराम करीम (माकप) ही निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची नाव आहे. उपसभापती हरीवंश यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप या खासदारांवर आहे. कृषी विधेयकाच्या विरोधात या विरोधी खासदारांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घातला आणि रुल बुक फाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी गोंधळ घालणार्‍या आठ खासदारांचं सात दिवसांसाठी निलंबन केलं. दरम्यान, विरोधकांनी राज्यसभेचे उपसभापती हरीवंश यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दिला होता, जो सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटळला.

Tagged