corona

सर्वाधिक स्वॅब रिपोर्ट आज येणार असल्याने जिल्हा चिंतेत

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि.5 : बीड जिल्ह्यातून आज सर्वाधिक स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या विषाणू निदान प्रयोग शाळेत पाठविण्यात आलेले आहेत. त्यामुळे जिल्हावासियांची धाकधूक वाढली आहे.

कालच बीड जिल्ह्यात 251 स्वॅब नमुन्यांपैकी 9 अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले होते. तर बाहेर जिल्ह्यात इतर आजारासाठी उपचाराला गेलेले तिघेजण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. परळीत तर एसबीआय शाखेचे पाच कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने अख्खी परळीत आणि काही गावे जिल्हा प्रशासनाने कंटेन्मेट झोन घोषित केली आहेत. त्यामुळे 12 जुलैपर्यंत परळी व 9 जुलैपर्यंत बीड शहर बंद असणार आहेत.
आज पाठविलेल्या नमुन्यांपैकी जिल्हा सामान्य रुग्णालय बीड येथून 32, स्वाराती महाविद्यालय आंबाजोगाई 2, उपजिल्हा रुग्णालय परळी 50, उपजिल्हा रुग्णालय केज 28, उपजिल्हा रुग्णालय गेवराई 19, ग्रामीण रुग्णालय आष्टी 16, कोविड केअर सेंटर बीड 55, कोविड केअर सेंटर अंबाजोगाई 46 असे मिळून एकूण 248 स्वॅब नमुने पाठविण्यात आलेले आहेत.
बीड जिल्ह्यात 135 व जिल्ह्यातीलच पण बाहेर जिल्ह्यात उपचार घेतलेले 11 असे मिळून एकूण 146 रुग्ण असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
उस्मानाबादेत 1, औरंगाबाद 4, मुंबई 1, पुणे 1, नगरमध्ये 3 असे 10 रुग्ण बीड जिल्ह्यातील असून ते इतर जिल्ह्यात उपचार घेत आहेत. तर बीड जिल्ह्यात 31 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

Tagged