शहिद भारतीय जवानांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आले, चीनची क्रुरता जगासमोर

देश विदेश न्यूज ऑफ द डे

गलवान खोर्‍यात चीनी सैनिकांशी लढताना भारताचे 20 जवान शहीद झाले

दिल्ली ः भारत आणि चीनमध्ये गलवान खोर्‍यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहिद झाले आणि देशात संतापाची लाट पसरली. आता या शहिद जवानांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आले आहेत ज्यात चीनने त्यांच्यावर किती क्रुरपणे वार केले आणि त्रास दिला हे समोर आले आहे.

पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सैनिकांच्या अंगावर खोल जखमा झाल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी काही जण हायपोथर्मिया शरिराचे तापमान अत्यंत कमी झाल्याने आणि गुदमरल्यामुळे मरण पावले आहेत. लेहमधील एसएनएम रुग्णालयात मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.
अधिकार्‍यांनी सांगितले की, शहीद जवानांच्या शरीराच्या अवयवांवर खोल जखमांचे निशाण आहेत आणि त्यांच्यासोबत क्रूरपणे मारहाण केली आहे.

चीनी सैन्याने भारतीय सैनिकांवर तारा असलेल्या रॉडने हल्ला केल्याचं स्पष्ट झालं आहे. जवळपास 17 जवानांच्या शरीरावर मारहाणीचे खोल निशाण आहेत. सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये कर्नल संतोष बाबूसह 3 जवानांच्या शरीरावर कोणतेही निशाण आढळले नाहीत, पण त्यांच्या डोक्यावर जोरदार हत्याराने प्रहार केल्याचं दिसून आलं आहे.

इतर 3 जवानांचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला असा अंदाज आहे. 3 जवानांचे चेहरेही ओळखता येत नव्हते तर अन्य 3 जवानांच्या गळ्याभोवती वाळूचे घट्ट निशाण होते.
तसेच या जवानांना कोणी नखं मारल्याचं दिसत आहे. चीनी सैनिकांकडे चाकूदेखील होते, काही जवान उंचावरुन नदीत पडले. 14 हजार फूट उंचावर असणार्‍या गलवान खोर्‍यात थंड प्रदेश आणि दुर्गम भाग असल्याने मदत मिळण्याअभावी त्या सैनिकांचा जीव गेला. 12 जखमी जवानांचा मृत्यू हायपोथर्मिया आणि श्वास रोखल्याने झाला असल्याचं पोस्टमोर्टममध्ये समोर आलं.


Tagged