कौतुकास्पद! कोरोनामुळे अनाथ झालेल्या दोन चिमुकल्यांची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळेंनी स्वीकारली

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

पुणे | देशात कोरोनाचा कहर अगदी भयावह करणारा आहे. कोरोनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहे. अनेक बालके अनाथ झाली आहेत, अनेकांनी आपले प्राण गमावले. अशातच कोरोनामुळं अनाथ झालेल्या दोन मुलींचं पालकत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वीकारलं आहे.

सोशल मीडियाच्या माध्यामातून बातमीची दखल घेत सुप्रिया सुळे यांनी जेजुरीयेथील अनाथ झालेल्या दोन मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. याविषयी बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, ही धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घेत या दोन्ही मुलींना मदत करणं हे कर्तव्य आहे. या मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आमचं कुटुंब घेत आहे.

पुढे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, जेजुरीतील आमचे सहकारी दिलीपदादा बारभाई तातडीने कोणालातरी तिथे पाठवत आहेत. चौकशी करुन त्यांच्या आजी-आजोबांना कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीनं त्यांची जबाबदारी आम्ही घेत आहोत.

दरम्यान जेजुरीमधील घोणे कुटुंबातील साडे चार वर्ष आणि दीड वर्ष लहानग्या दोन मुलींच्या आई-वडिलांचे कोरोनामुळे निधन झालं. त्यामुळे या दोघींची जबाबदारी आजी-आजोबांवर पडली. ही बातमी सुप्रिया सुळे यांनी समजतात या चिमुकल्यांची जबाबदारी स्विकारली .

Tagged