आ. सुरेश धसांनी कोयत्याच्या आडून राजकारण करणे थांबवावे-भाई थावरे

न्यूज ऑफ द डे बीड राजकारण

माजलगाव : आमदार सुरेश धस हे गेल्या काही दिवसांपासून ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाला पुढे करून कोयत्याच्या आडुन राजकारण करीत आहेत, ते त्यांनी थांबवावे. जर कारखाने वेळेवर सुरू झाले नाही तर ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. तेव्हा ऊसतोड कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी हे एकाच गाडीचे दोन चाके आहेत. शासनाने त्वरीत मार्ग काढावा अशी मागणी भाई गंगाभिषण थावरे यांनी केली आहे.

मागील चार -पाच वर्षापासून दुष्काळाच्या झळा भोगणार्‍या मराठवाड्यात यावर्षी चांगला पाऊस झाला. ऊसाचे लागवडी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. ऊसाचे पिक ही मोठ्या जोमात आलेले आहे. कारखाने वेळेवर सुरू झाले तर ऊसाचे गाळप नियोजित काळात होईल. अन्यथा गाळपाविना ऊस उभा राहिला गेला तर शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल. याचा आमदार सुरेश धस यांनी विचार करावा, ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांना पुढे करून कोयत्याच्या आडून चालवलेले आंदोलन थांबवावे, असा आरोप भाई थावरे यांनी करत ऊसतोड कामगार व ऊस उत्पादक शेतकरी हे एकाच गाडीचे दोन चाके आहेत, तेव्हा ऊसतोड कामगारांचा प्रश्न शासनाने त्वरीत निकाली काढावा, अशी शासनाकडे थावरे यांनी मागणी केली.

Tagged