पालकमंत्री धनंजय मुंडे बांधावर

न्यूज ऑफ द डे बीड

गेवराईत पिके नुकसानीची केली पाहणी

बीड : जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे आज (दि.18) सकाळी 10 वाजेपासून गेवराई तालुक्यातील हिरापूर, इटकुर, मादळमोही, मिरकाळा, नंदपूर आदी गावांमध्ये प्रत्यक्ष बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. यावेळी मुंडे यांच्यासह युवा नेते विजयसिंह पंडित, महसूल, कृषी आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

  गेवराई तालुक्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून माजलगाव व वडवणी तालुक्यातही धनंजय मुंडे हे आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह माजलगाव तालुक्यातील तालखेड, फुलेपिंपळगाव, नित्रुड, वडवणी तालुक्यातील मोरवड, पुसरा आदी गावांमध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. दरम्यान, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील शेतकर्‍यांशी संवाद साधत धीर दिला. सरकार म्हणून पाठिशी असल्याचे सांगितले आहे.

महसूल राज्यमंत्री बीड जिल्ह्याचा दौर्‍यावर
उद्या (दि.19) राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार हे देखील गेवराई, बीड आदी तालुक्यांचा देखील दौरा करून पाहणी करणार आहेत. तर मुंडे हे पुढील दिवसात उर्वरित तालुक्यातही पाहणी करणार आहेत.

Tagged