ट्रकच्या धडकेत शेतकर्‍यासह तीन म्हशी ठार

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

मांजरसुंबा परिसरातील घटना; चालक फरार

नेकनूर  दि.21 : शेतात म्हशी घेऊन रस्त्याच्याकडेने जात असताना भरधाव आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये शेतकर्‍यासह तीन म्हशी जागीच ठार झाल्या. हा अपघात शनिवारी (दि.21) दुपारच्या सुमारास मांजरसुंबा परिसरात घडला. या घटनेनंतर मोठा जमाव जमा झाल्याने चालकाने ट्रक सोडून पलायन केले. काही काळ महामार्ग रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
     उदंडवडगाव-शिवाजीनगर येथील भानुदास वाघिरे (वय 55)हे सकाळी आपल्या म्हशी घेऊन शेताकडे निघाले होते. रस्त्याच्याकडेने जात असताना चौसाळ्याकडून भरधाव वेगात येणार्‍या ट्रकने (आर.जे. 40 जीबी 3946) वाघीरे आणि त्यांच्या सोबतच्या तीन म्हशींना जोराची धडक दिली. या अपघातात भानुदास वाघिरे हे जागीच ठार झाले तर ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने तिन्ही म्हशी मृत्युमुखी पडल्या. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर वस्तीवरील शेकडो नागरिकांनी महामार्ग रस्त्यावर उतरून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नेकनूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत संतत्प नागरिकांची समजूत काढत वाहतूक सुरुळीत केली.

Tagged