पदवीधरमध्ये सतीश चव्हाण यांच्या विजयाची औपचारिकताच बाकी

न्यूज ऑफ द डे राजकारण

औरंगाबाद, दि.3: पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण हे पुन्हा एकदा या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. कारण चव्हाण यांना पहिल्याच फेरीत दणदणीत 17 हजार 372 मतांची आघाडी मिळाली होती. रात्री पावणे अकरावाजता दुसरी फेरी जाहीर झाली त्याततही 12 हजार638 मतांची त्यांनी आघाडी घेतली होती. पहिली, दुसरी आणि टपाल मतदानात सतीश चव्हाण यांना 54477 मते मिळाली असून बोराळकर यांना 25547 मते मिळाली आहेत. म्हणजेच राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण 28927 मतांनी आघाडीवर आहेत.
पहिल्या फेरीची पहिल्या पसंती क्रमांकाची उमेदवार निहाय आकडेवारीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांना 27 हजार 850 मते मिळाली आहेत. शिरीष बोराळकरः 11 हजार 558, रमेश पोकळे 3हजार 500, मुंडे सिद्धेश्वर 5 हजार 506 मते मिळाली आहे. पहिल्या फेरीत एकूण 56 हजार मतपत्रिका उघडण्यात आल्या होत्या. त्यात 50620 मते वैध तर 5 हजार 381 मते विविध कारणांनी बाद झाली आहेत.
दुसर्‍या फेरीत चव्हाण यांना 26627 तर बोराळकरांना 13989 मते मिळाली. रमेश पोकळे यांना पहिल्या फेरीत 3478 तर दुसर्‍या फेरीत 1514 मते मिळाली. सिध्देश्वर मुंडे यांनी पहिल्या फेरीत 2506 तर दुसर्‍या फेरीत 1797 मते घेतली आहेत.

Tagged