dhananjay-munde

मुंडे प्रकरणात गृहमंत्र्यांसह शरद पवारांचं मोठं वक्तव्य

बीड

एसपी दर्जाच्या महिला अधिकार्‍यामार्फत चौकशी?
मुंबई : मंत्री धनंजय मुंडे dhananjay munde प्रकरणाची rape case सर्व बाजूने माहिती घेतली. या प्रकरणी खोलवर जाऊन तपास करण्याची गरज आहे. त्यासाठी एसपी दर्जाच्या महिला अधिकार्‍याने या प्रकरणाची चौकशी करावी अशी सूचना खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार sharad pawar यांनी केली आहे.

काल मी या प्रकरणावर बोललो तेव्हा संपूर्ण चित्रं माझ्यासमोर नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार केल्यावर तिची दखल घेतली. त्यामुळे गंभीर हा शब्द वापरला. आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये असं वाटतं. मुंडे यांचा राजीनामाचा घ्यावा किंवा नाही. यावर मतभिन्नता असू शकते. आरोप करणार्‍या महिलेच्या बाबतीत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समो आली पाहिजे. नाही तर कुणावरही आरोप करायचे आणि त्या व्यक्तीला सत्तेपासून दूर करायचं अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे या घटनेतील सत्य समोर यायला व्हावं. गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं आहे. पोलिसांनी या प्रकरणात खोलात जाऊन तपास करावा. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. या आरोपामधील सत्य बाहेर आल्यावर निर्णय घेता येईल. आरोप झाल्यावर संयम ठेवावा लागतो. सत्यता बाहेर येईपर्यंत थांबावं लागतं. शपथपत्रात मुंडेंनी माहिती लपवली की नाही हे पाहावं लागेल. देशात अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. देशातील सर्वोच्च प्रमुखांच्याबाबतीतही अशा गोष्टी झाल्या आहेत. त्याच्या खोलात जायची गरज नाही. मात्र सत्ता हातातून गेल्याने काही जण अस्वस्थ आहेत.

तसेच, कायद्यापेक्षा कोणताही मंत्री मोठा नसल्याचं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही असेही ते म्हणाले. धनंजय मुंडे प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

‘त्या’ महिलेविरोधात मुंडेंच्या मेव्हण्याची तक्रार
राज्यातील मंत्री धनंजय मुंडे यांना बलात्कार आरोप प्रकरणात दिलासा मिळताच सदर प्रकरणाला आणखी एक ट्विस्ट आला आहे. आरोप करणारी महिला, तिची बहीण आणि भावाविरोधात मुंडेंच्या मेहुण्यांनीही दिली होती तक्रार. मुंडे यांचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांच्याकडून नोव्हेंबर महिन्यात ही तक्रार करण्यात आली होती. परंतू अद्याप पोलिसांनी त्या तक्रारीवर कार्यवाही केली नसल्याचे समजते.

तक्रारदार महिला माध्यमांशी संवाद साधणार
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणारी महिला आज प्रसार माध्यामांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजता पीडित महिलेचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांनी महिलेला बोलावलं होतं. परंतु, त्यांच्या वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आज जबाब नोंदवण्यासाठी हजर राहणार नाही. अशातच आज दुपारी तक्रारदार महिला प्रसार माध्यमांशी पत्रकार परिषद घेऊन बोलण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवण्यात आला होता. मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी सखोल तपास सुरु आहे. तसेच तक्रारदार महिलेनं काही ट्वीट करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मी एकटी विरुद्ध महाराष्ट्र असं चित्र निर्माण झालंय!
ट्वीटमध्ये महिलेनं म्हटलं आहे की, मी खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी एवढ्या लोकांना एकत्र यावं लागतंय. मी एकटी विरुद्ध महाराष्ट्र असं चित्र निर्माण झालंय. तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहित बसा. जर मी चुकीची होते तर एवढे दिवसांत माझ्याविरोधात तक्रार का केली नाही? मला पाठीमागे हटावं लागलं तरी मला गर्व आहे की, मी एकटी लढले.

Tagged