तक्रारदार महिला आरोपांबाबत ठाम; म्हणाली, त्यांच्याकडे व्हिडीओ आहेत..

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड राजकारण

धनंजय मुंडेंविरूद्ध अत्याचाराच्या तक्रारीचे प्रकरण
मुंबई : धनंजय मुंडे प्रकरणात तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदार महिलेवरच ब्लॅकमेलिंगचे आरोप केले आहेत. त्यानंतर तिने आज एका मराठी वृत्तवाहिनीवर संवाद साधताना मुंडेंवर सनसनाटी आरोप केले आहेत. ते माझ्याशी शारिरीक संबंध ठेवत होते, त्यांनी माझे व्हिडीओ तयार केले असल्याचा गंभीर आरोप जाहीररित्या केला आहे.

पुढे बोलताना ती म्हणाली, सन 2006 पासून धनंजय मुंडे हे माझी लाईफ सेटल करून देतो असं म्हणत अत्याचार करत असल्याची तक्रार दिली. यापूर्वी मी तक्रार देण्याचा प्रयत्न केला, परंतू माझ्याशी शारिरीक संबंध केल्याचे व्हिडिओ तयार करून माझ्यावर तक्रार देऊ नये यासाठी दबाव आणण्यात आला होता. तसेच, रिझवान शेख नामक व्यक्ती माझ्या मागे लग्नासाठी लागला होता. त्याच्या तक्रारीत तत्थ नाही. यापूर्वीच त्याचे दोन लग्न होते. तो मला जाणीवपूर्वक त्रास देत होतो, त्याने मी नकार दिल्याच्या रागातून माझ्यावर खोटा एफआयआर दाखल केला. त्यांचे पुढे काय आहे? असा प्रश्नही तक्रारदार महिलेने केला आहे. मी पोलिसात धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. माध्यमात बातम्या आल्यानंतर पोलिसांनी चार ते पाच तासानंतर तक्रार घेतली. तसेच, भाजप नेते कृष्णा हेगडे यांच्या आरोपांबाबत उत्तर देताना तक्रारदार महिला म्हणाली, कृष्णा हेगडे यांचा मी आदर करते. त्यांची आणि माझी आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टीत ओळख झाली. तेव्हापासून मी त्यांना ब्रॉडकास्टद्वारे व्हॉट्स अ‍ॅपला माझे गाणे पाठविलेले आहेत. याशिवाय 2017 नंतर कसलेही चॅटिंग नाही, हे तिने जाहीररित्या व्हॉट्स अ‍ॅप चॅट दाखवत सांगितले आहे. कदाचित ते धनंजय मुंडे यांचे मित्र आहेत म्हणून अशी वक्तव्य करत असावेत, असं म्हटलं आहे. तसेच, मनसे नेते मनीष धुरी यांच्या आरोपाबाबत ती म्हणते, त्यांच्याशी मी भेटलेली आहे. त्यांच्या माझ्या गायन क्षेत्राशी संबंधित आहेत. दारू पिवून धनंजय मुंडेंना शिव्या देणारे मनीष धुरी आज त्यांची बाजू घेत आहेत. त्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, असे आव्हान दिले आहे. तसेच, माझ्यावर खोटे आरोप आहेत, मी एकटी लढत असून माझ्यावर आरोपावर आरोप केले जात आहे. आता तरी राज्य शासनाने माझी तक्रार गांभीर्याने घ्यावी. मी महाराष्ट्र पोलीस, मुंबईचा सन्मान करते. माझी तक्रार कोणाविरोधात नसून फक्त धनंजय मुंडे यांच्याविरोधात आहे, असं ठणकावून सांगितले आहे.

Tagged