jail, turung, kaidi

महिला न्यायधीशाला वाढदिवसाचा मेसेज पाठवला; वकील 20 दिवसांपासून जेलमध्ये

क्राईम देश विदेश

दि. 2 : आपली क्रिएटीव्हीटी एका वकीलाला चांगलीच महागात पडली आहे. महिला न्यायधीशाच्या फोटोचं ग्रिटींग तयार करून त्यांना मध्यरात्री इ-मेलद्वारे शुभेच्छा दिल्या म्हणून महिला न्यायधीशांनी आक्षेप घेत या वकीलावर थेट आयटी कायद्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी संबंधीत वकिलाला बेड्या ठोकल्या. आता हा वकील जामीनासाठी न्यायालयाचे उंबरे झिजवत असून त्याला खालच्या एकाही कोर्टाने जामीन दिलेला नाही. या प्रकरणात त्याने आता उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्हा न्यायालयातील महिला न्यायाधीशांचा जानेवारी महिन्यात वाढदिवस होता. वकील विजयने रात्री एक वाजून 11 मिनिटांनी न्यायाधीशांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या. वकिलाने न्यायाधीशांच्या फेसबुक अकाऊंटवरुन त्यांचा फोटो डाऊनलोड केला आणि तो ग्रीटिंग कार्डच्या स्वरुपात पाठवला. वकील विजयने पाठवलेल्या अशाप्रकारच्या शुभेच्छा न्यायाधीशांना पसंत पडल्या नाहीत. त्यांनी वकिलाची तक्रार रतलाम पोलीस स्टेशनमध्ये केली. रतलाम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ पाटीदार यांनी सांगितलं की, वकील विजय ज्युनियर असून तो प्रॅक्टिस करत आहे. तू अद्याप पूर्णत: वकील बनलेला नाही. आणखी एक परीक्षा दिल्यानंतर त्याला स्टेट बारला कळवावं लागेल. यानंतर त्याला वकिलीचा परवाना मिळू शकेल. मात्र वकिलांची प्रतिष्ठा खराब केल्याने बार असोसिएशनने त्याचं सदस्यत्व आधीच बर्खास्त केलं आहे. महिला न्यायधीशांच्या तक्रारीनंतर रतलाम पोलिसांनी वकील विजयविरोधात आयपीसीच्या कलम 420, 467, 468, 469 आणि आयटी कायद्याच्या कलम 67 आणि 41 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला 9 फेब्रुवारी रोजी अटक केली. तेव्हापासून तो जेलमध्येच आहे. न्यायदंडाधिकारी प्रथम न्यायालयात जामीन न मिळाल्याने त्याने सत्र न्यायालयात अर्ज केला होता, मात्र तिथेही त्याला दिलासा मिळाला नाही. आता त्याने हायकोर्टाच्या इंदूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्याच्या जामीनावर उद्या म्हणजेच 3 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

शुभेच्छा पाठवणारा वकील म्हणतो…
दरम्यान सामाजिक कार्यकर्ता आणि जय कूल देवी सेवा समिती, रतलामचा अध्यक्ष म्हणून मी हा शुभेच्छा संदेश पाठवला होता. तसंच न्यायाधीशांचा फोटो त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरुन नाही तर गूगलवरुन डाऊनलोड करुन घेतला होता. त्याचा वापर क्रिएटिव्ह डिझायनर म्हणून केला, असा दावा त्याने आपल्या जामीन अर्जात केला आहे. आता सर्वोच्च न्यायालय त्याला जामीन देते की नाही हे पहावे लागेल.

Tagged