आज कोरोना चारशेच्या घरात

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

एकट्या बीड तालुक्यात 127 रूग्ण

बीड : लॉकडाऊन असुनही कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आजचा कोरोनाचा आकडा चारशेच्या घरात आहे. त्यामुळे नागरिकांनी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

  मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाला गुरुवारी 2 हजार 956 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 393 अहवाल पॉझिटिव्ह तर 2 हजार 563 इतके अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात सर्वाधिक बीड तालुक्यात 127, अंबाजोगाई 65, आष्टी 45, धारूर 4, गेवराई 11, केज 33, माजलगाव, परळी प्रत्येकी 34, पाटोदा 26, शिरूर 5, वडवणी 9 असे रूग्ण आढळून आले आहेत.

1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
Tagged