अजनुही कोरोनाचा धोका, लॉकडाऊनचे निर्बंध पाळा

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

जिल्हाधिकार्‍यांचा इशारा; कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी प्रशासन सज्ज

बीड : जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही अजनुही धोका मात्र कमी झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनचे निर्बंध पाळावेत, अन्यथा पुन्हा लॉकडाऊनची वेळ येईल असा इशारा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे. तसेच, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठीही जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत गुरुवारी ते बोलत होते. यावेळी जगताप यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर. राजा, उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, तहसीलदार शिरीष वमने आदींची उपस्थिती होती. पुढे म्हटले आहे की, कोरोना रूग्णांचा आकडा, मृत्यूदर कमालीने घटला आहे. राज्यातील इतर 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथील करण्यात येत असल्याचे समजते. परंतू बीड जिल्ह्यातील धोका कमी झाला आहे, असं समजून नागरिकांनी वागू नये. सर्वांनाच लॉकडाऊन कडक पाळावा लागेल. कोरोनासह आता म्युकर मायकोसिसने डोके वर काढले आहे. तसेच, कोरोनाचे बाल रुग्ण वाढत आहेत, त्याचीही तयारी करावी लागत आहेत. कोविड नियमांचे पालन करावेच लागेल. आतापर्यंत 78 हजार 629 बाधित जिल्ह्यात सापडले. पहिल्या लाटेच्या तुलनेत रिकव्हरी रेट वाढला आहे. पहिल्या लाटेच्या 336 दिवसात 3.8 टक्के मृत्यूदर होता. तर दुसर्‍या लाटेत 94 दिवसात मृत्यू वाढले, परंतू 2.10 टक्के मृत्यूदर होता. जिल्ह्यात यंत्रणा अपुर्‍या असूनही आपण लाट हाताळण्यात यशस्वी झालो. ग्रामीण भागात मिशन झिरो डेथ मिशनने रुग्ण कमी आले, पथकाने उत्तमरीत्या कामे केली. त्यामुळे प्रामाणिकपणे तपासण्या केल्याने रुग्ण वाढत होते. कोरोना प्रतिबंधक दल, सेवाभावी संस्थांचे जिल्हाधिकारी जगताप यांनी आभार मानले आहेत. तसेच, तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर नवीन काही यंत्रणा, बीडमध्ये कोरोना चाचणी लॅब सुरु करत आहोत. त्यांचे काम महिन्यात पूर्ण होईल. दोन ठिकाणी विद्युत शवदाहिनी सुरू होतील. बालरूग्णांसाठी अतिदक्षता कक्ष सुरु करण्यात येत असून 100 बेड तयारी केली आहे. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जात आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी म्हटले आहे.

Tagged