बीड दि.19 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बीड तालुक्यातील खालापुरी येथील डीसीसी बँकेच्या शाखेत लाच मागितल्याप्रकरणी प्रशासक/कॅशिअरवर शनिवारी (दि.19) कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सुंदर भागवतराव बांगर (सेवा सहकारी सोसायटीवर प्रशासक म्हणून नियुक्त आहेत) असे लाचखोर अधिकार्याचे नाव आहे. तक्रारदराच्या संस्थेचे लेखापरीक्षण केले होते. त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी बांगर याने पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी केल्याप्रकरणी बांगरवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे, पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी, पोना.श्रीराम गिराम, पोशि.गारदे, मोरे यांनी केली. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.