corona

बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दोनशेच्या जवळ

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान

बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या गत चार दिवसांपासून वाढत असून शनिवारी (दि.१०) कोरोनाचा आकडा दोनशेच्या जवळ गेला आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी ४०८५ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.१०) प्राप्त झाले, त्यामध्ये १८८ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३८९७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ३०, अंबाजोगाई ६, आष्टी ८१, धारूर ६, गेवराई २१, केज १५, माजलगाव २, पाटोदा १७, शिरूर ७, वडवणी ५ असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, कोरोनाचा आकडा गत चार दिवसांत १०० वरून २०० च्या घरात गेला आहे, त्यामुळे वेळीच कोरोना नियमांचे पालन करून कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

Tagged