पकडलेल्या ’त्या’ 16 टिप्परला प्रत्येकी साडे तीन लाखाचा दंड

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.23 : तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदापात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन व वाळू वाहतूक करणार्‍या 17 हायवा टिप्पर व केनी जप्त करण्यात आल्या होत्या. यातील एक टिप्पर उमापूर पोलीस चौकीला जमा करण्यात आले असून 16 टिप्परवर प्रत्येकी 3 लाख 50 हजारांचा दंड करण्यात आला आहे. ही कारवाई तहसीलदार सचिन खाडे यांनी केली.

गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदापात्रामध्ये 19 जुले रोजी अवैध वाळू उत्खनन व वाळू वाहतूक करणार्‍या 17 हायवा टिप्पर व केनी जप्त करण्यात आल्या होत्या. पकडलेली टिप्पर गेवराईच्या शासकीय विश्रामगृहात लावण्यात आली होती. शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसूल बुडवून या गाड्या सर्रासपणे वाळूची वाहतूक करत होत्या. या प्रकरणी 16 टिप्परला प्रत्येकी 3 लाख 50 हजारांचा दंड करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी राक्षसभूवन सज्जाचे तलाठी यांना प्राधीकृत करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली.

Tagged