बीड दि.5 : करुणा शर्मा परळीत रविवारी (दि.5) दुपारच्या सुमारास दाखल झाल्या. यावेळी मंदिर परिसरामध्ये महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच सोबत असलेल्या एकाने चाकूने पोटावर वार केला. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात करुणा शर्मासह अन्य एकावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाखा रविकांत घाडगे (रा.शिवाजीनगर परळी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी दुपारी परळी वैजीनाथ मंदिरपरिसरामध्ये करुणा शर्माने जातीवाचक शिवीगाळ केली. शिवीगाळ का करत आहेत असा जाब विचारताच सोबत असलेल्या बेबी छोटूमिया तांबोळी हिचे उजव्या हातास धरुन ओढून खाली पाडले. त्यामुळे तिच्या उजव्या हातास जखम झाली. त्यानंतर अरुण दत्तात्रय मोरे (रा.मुंबई) याने त्याच्यााकडील चाकू काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केला. म्हणून या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात करुणा शर्मा, अरुण मोरे यांच्यावर गुरंन. 142/2021 कलम 307, 323, 504, 506, 34 भादवी सह अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपअधीक्षक सुनिल जायभाये करत आहेत.
दरम्यान या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, तपासअधिकारी उपअधीक्षक सुनिल जायभाये, परळी शहर ठाण्याचे पोनि.हेमंत कदम यांच्याशी भ्रमनध्वनीद्वारे संपर्क केला असता कुणाशीही संपर्क होऊ शकला नाही.
परळी : करुणा शर्मा यांच्या संदर्भातील बातम्या…
करुण शर्मांच्या अटकेची मागणी…
https://karyarambhlive.com/news/8133/
करुणा शर्माच्या वाहनात आढळले पिस्तुल…
https://karyarambhlive.com/news/8129/
करुणा शर्मा परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल…
https://karyarambhlive.com/news/8125/
करुणा शर्मा परळीत दाखल…
https://karyarambhlive.com/news/8122/