आयपीएस पंकज कुमावत यांचा गुटखा माफियांना दणका!

कोरोना अपडेट क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड तालुक्यातील इमामपूर परिसरात गुटखा पकडला
बीड
दि.16 : बीड जिल्ह्यात सर्रासपणे गुटख्याची विक्री केली जात असल्याचे आयपीएस प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक पंकज कुमावत यांच्या कारवायावरुन समोर येत आहे. पंकज कुमावत यांनी केज उपविभागाचा पदभार स्विकारताच गुटखा माफियांकडे आपला मोर्चा वळवला. आतापर्यंत त्यांनी गुटख्याच्या कारवाया करत कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंगळवारी (दि.16) बीड तालुक्यातील इमामपूर परिसरातील गोदामावर छापा टाकत 25 ते 30 लाखांचा गुटखा जप्त केला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील नांदूरघाट येथे गुटखा विक्रेत्यावर आयपीएस पंकज कुमावत यांनी मंगळवारी सकाळी कारवाई केली. त्याने गुटखा कुठून आणला याची माहिती घेतली असता त्याने इमामपूर येथून गुटखा घेतल्याची माहिती दिली. त्या आधारे पंकज कुमावत यांनी इमामपूर येथील गोदामावर छापा मारला. यावेळी 25 ते 30 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. यामध्ये आणखी कुणाकुणाचा हात आहे. याचा तपास पंकज कुमावत करत आहेत. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीसही दाखल झाले आहेत. पंकज कुमावत यांच्या धाडशी कारवायामुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Tagged