BEEED JILHA PARISHAD

‘हे’ जिल्हा परिषद गट एसटी प्रवर्गासाठी आरक्षित होण्याची शक्यता

केज न्यूज ऑफ द डे

अनेक विद्यमान जि. प.सदस्यांची होणार गोची

अमोल जाधव|नांदूरघाट
दि.१७ : जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडावर आली आहे. कोणत्याही क्षणी या निवडणूकीचा कार्यक्रम लागू शकतो, त्यानुसारच या निवडणूकीत मातब्बर आणि विद्यमान सदस्यांची मोठी गोची होण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यातील पिंपळनेर, चौसाळा, कडा, धोंडराई, विडा, गंगामसला, भोगलवाडी आणि पट्टीवडगाव हे गट एससीसाठी तर युसूफवडगाव हा गट एसटीसाठी आरक्षीत होण्याची शक्यता आहे.

मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते, याच मिनी मंत्रालयाच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपणार आहे. प्रत्येकाला चिंता आहे आपला गट सुरक्षित राहावा, मात्र बऱ्याच ठिकाणी मोठे फेरबदल होण्याची संभावना आहे. २०११ च्या जनगणनेनुसार एससीच्या उतरत्या क्रमाच्या आधारे बीड तालुक्यातील पिंपळनेर आणि चौसाळा हे अनुसूचित जातीसाठी राखीव राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, आष्टी तालुक्यात कडा, गेवराई तालुक्यात धोंडराई, केज तालुक्यातील विडा, माजलगाव तालुक्यातील गंगामसला, धारुर तालुक्यातील भोगलवाडी व अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव हेही गट अनुसूचित जातीसाठी 2011 च्या जनगणनेनुसार उतरत्या क्रमांकाच्या आधारे 2022 चे संभाव्य जिल्हा परिषद आरक्षित गट राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केज तालुक्यातील युसूफवडगाव हा गट एकमेव गट एसटीसाठी आरक्षीत राहण्याची शक्यता आहे. आरक्षणाची सोडत लवकरच होईल, परंतू सदरील संभाव्य आरक्षित गट राहू शकतात, त्यामुळे या गटातर प्रस्थापित पुढाऱ्यांचे वर्चस्व जे होते त्याला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. यातून नवीन चेहरा त्या भागाचे नेतृत्व करतील, त्यामुळे काही गटात कही खुशी कही गम असे चित्र पहावयास मिळेल.

Tagged