अंबाजोगाई : येथील दीनदयाळ नागरी बॅंकेवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलची पुन्हा एकदा एकहाती सत्ता आली आहे.
दीनदयाळ पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमतांनी विजयी झाले, अशी माहिती पंकजा मुंडे यांच्या प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे. १५ जागांकरिता ही निवडणूक झाली होती. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्यासह ४ उमेदवार अगोदरच बिनविरोध झाले होते.
विजयी संचालक व त्यांना मिळालेली मतं – मकरंद कुलकर्णी (2497), राजाराम धाट (2494), बाळासाहेब देशपांडे(2453), विवेक दंडे(2453), मकरंद पत्की(2441), चैनसुख जाजू(2403), राजेश्वर देशमुख(2385), बिपिन क्षीरसागर(2374), अशोक लोमटे(2334), विजयकुमार कोपले(2314), राजाभाऊ दहिवाळ (2375)
बिनविरोध विजयी संचालक – पंकजाताई मुंडे, शरयू हेबाळकर, किशन पवार, जयकरण कांबळे