ajit pawar

पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू, 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण शाळेतच : अजित पवार

बीड

पुणे : 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु होणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय पालक घेतील, असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारने 23 जानेवारीपासून राज्यभरातील शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने शाळांबाबतचा निर्णय जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडे सोपवला होता. त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून शाळा सुरुही झाल्या. मात्र, पुण्यातील शाळा अद्याप बंदच आहेत. पुण्यातील कोरोना परिस्थिती आढावा घेऊन शाळांबाबत निर्णय घेऊ अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती. त्यानंतर आता पुण्यातील शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.