स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे मी पहिली राजकीय निवडणूक जिंकू शकलो!

न्यूज ऑफ द डे परळी बीड

भावूक होऊन लोकनेत्याच्या स्मृतीस पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिला उजाळा

परळी : ३ जून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त लोकनेत्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे सामजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येऊन त्यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना अनेक आठवणींना उजाळा दिला.

स्व.गोपीनाथ मुंडे यांनी मला पहिल्यांदा आग्रह करून म्हणाले की, मी लढलेल्या १९७८ च्या जिल्हा परिषदेच्या पट्टीवडगावमधूनच धनंजय मुंडे यांनी निवडणूक लढवावी म्हणत त्यांनी मला आग्रह धरला. माझ्या जीवनाची पहिली राजकीय निवणूक लढवण्यासाठी पट्टीवडगाव जिल्हापरिषद निवडणुकीस उभे करण्यासाठी माझ्या वडिलांचा (अण्णाचा) निवडणुकीस विरोध असताना ही त्यांनी मला उभं केलं आणि मी निवडून आलो, ही माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात आणि आजपर्यंत ही माझ्यासाठी त्यांची न विसरणारी आठवण आहे, असे यावेळी बोलताना धनंजय मुंडे भावूक होऊन माध्यमांशी बोलले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, माजी आमदार केशवराव आंधळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Tagged