टिप्पर कारचा अपघात; एक ठार, दोघे जखमी

बीड : अंबाजोगाई येथील झंवर कुटुंब पती, पत्नी व मुलगी हे कारने औरंगाबाद येथून अंबाजोगाई येथे परत येताना टिप्पर व कारची धडक होऊन घडलेल्या अपघातात पत्नी ठार तर मुलगी व पिता जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर महामार्गावर कोळवाडी जवळ आज शुक्रवारी (दि.३०) पहाटे घडली आहे. मुलगी गंभीर जखमी असून उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले असल्याचे समजते. […]

Continue Reading

लाचखोर तलाठ्यासह खाजगी इसम बीड एसीबीच्या जाळ्यात

बीड दि.26 : टॅक्स पावती न देता 7/12 फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याने दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडअंती सात हजार रुपये खाजगी इसमाच्या हस्ते स्वीकारताना दोघांनाही बीड एसीबीने सोमवारी (दि.26) अंबाजोगाई शहरात रंगेहाथ पकडले. प्रफुल्ल सुहासराव आरबाड (वय 30 रा.प्रशांतनगर, अंबाजोगाई) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तर नजीरखान उमरद राजखान पठाण (वय 43 रा.फ्लॉवर्स […]

Continue Reading
ACB TRAP

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.13 : सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर बिल काढून दिल्याबद्दल मोबदला म्हणून ग्रामसेवकाने लाचेची मागणी केली. या लाचखोर ग्रामसेवकाला मंगळवारी (दि.13) सायंकाळच्या सुमारास पंचायत समितीच्या आवारात आठ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुजारी अशोक विठ्ठलराव (वय 52 रा.हानुमान मळा, अंबाजोगाई) असे […]

Continue Reading

डीवायएसपी जायभायेंची अकार्यकारी पदावर नियुक्ती, वासुदेव मोरे निलंबित

बीड दि.18 : अवैध धंद्यांची पाठराखण करणार्‍या अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे व नुकतेच नियंत्रण कक्षात संलग्न केलेले पोलीस निरीक्षक वासुदेव मोरेंना निलंबित करण्यात आले. तर अंबाजोगाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये यांची अकार्यकारी पदावर नियुक्ती करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.18) विधीमंडळ अधिवेशनात केली. या संदर्भात आ.नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी केली होती. या कारवाईने […]

Continue Reading