mahalxmi kalakendra kaij

कला केंद्राआडून वेश्या व्यवसाय, उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदेवर गुन्हा नोंद

केज ठाणे हद्दीत आयपीएस पंकज कुमावत यांची कारवाई बीड, दि.7 : केज तालुक्यात रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या एका कलाकेंद्रावर सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा मारला. येथून अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांनी कलाकेंद्र चालकांसह काही ग्राहकांना देखील अटक केली आहे. रात्री उशीरा मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांना या कलाकेंद्रात वापरलेले व न […]

Continue Reading

बीड एलसीबीने राज्यात धुमाकूळ घालणारा कुख्यात कार चोर पकडला!

केशव कदम – बीड बीड दि.6 : स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून पदभार घेतात पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी पाहिली कारवाई केली आहे. गुरुवारी (दि.6) कार चोराच्या मुसक्या आवळल्या असून त्याकडून एक कार जप्त करण्यात आली आहे. सदरील आरोपी हा सराईत असून त्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. शेख नदीम शेख दाऊत (रा.धाड ता. […]

Continue Reading

आष्टी डीवायएसपी यांची बीड तालुक्यात गुटख्यावर कारवाई!

जिल्ह्यात कुणी कुठेही कारवाई करण्याचे आयजींचे होते आदेशबीड दि. 4 : बीड येथे झालेल्या बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण (IG DNYANESHWAR CHAVHAN) यांनी डीवायएसपी (DYSP) यांनी जिल्ह्यात कुठेही कारवाई करावी, अशा सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने आष्टी विभागाचे उपअधीक्षक अभिजीत धराशिवकर यांनी बीड तालुक्यातील घोडका राजुरी शिवारात सोमवारी (दि.3) रात्री साठा केलेला गुटखा जप्त […]

Continue Reading

बीड स्थानिक गुन्हे शाखेला मिळाला अधिकारी !

बीड केशव कदम दि. 26 : येथील स्थानिक गुन्हेचे निरीक्षक सतीश वाघ यांची आठवडाभरापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली. त्यानंतर बीड स्थानिक गुन्हे शाखेत संतोष साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सोमवारी (दि.3) काढले स्थानिक गुन्हे शाखा ही पोलीस दलातील सर्वात महत्वाची शाखा आहे. त्यामुळे या पदावर […]

Continue Reading

वाळू माफिया,लोकेशन बॉय ताब्यात; सव्वा कोटीची मुद्देमाल केला जप्त!

आयएएस आदित्य जीवने, पंकज कुमावत यांची कारवाई गेवराई : दि. 3 : अवैध वाळू उपसा जोमात सुरू असल्याचे वारंवार होणाऱ्या कारवाया वरून दिसत आहे. आयएएस आदित्य जीवने व सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी सोमवारी (दि.3) पहाटेच्या सुमारास वाळू माफिया, वाहतूकीसाठी लोकेशन देणारे लोकेशन बॉय यांना ताब्यात घेत तब्बल 1 कोटी 17 लाख 50 हजार […]

Continue Reading

भीषण अपघातात दोन प्राध्यापकांचा जागीच मृत्यू!

जाटनांदूर | सुनील जेधे बीड दि.3 : नेहमीप्रमाणे सकाळी शिरूर येथील महाविद्यालयात ड्युटीसाठी जात असलेल्या प्राध्यापकांच्या दुचाकीचा आणि कारचा भीषण अपघात झाला, यामधे दोन प्राध्यापकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड शहराजवळील मुर्शदपुर फाटा येथे सोमवारी (दि.3) सकाळी घडली. शिरुर तालुक्यातील जाटनांदूर येथिल प्राध्यापक शहादेव शिवाजी डोंगर (वय 44 रा. जाटनांदूर ता.शिरूर) व प्राध्यापक अंकुश साहेबराव […]

Continue Reading

टेम्पो-स्कार्पिओचा भीषण अपघात;चौघांचा जागीच मृत्यू

पाटोदा तालुक्यातील जाटनांदूर फाट्याजवळील घटना सुनील जेधे । जाटनांदूरदि.28 ः भरधाव टेम्पोने स्कार्पिओला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात स्कार्पिओ गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेे आहे. हा अपघात बुधवारी (दि.28) सांयकाळच्या सुमारास पाटोदा तालुक्यातील जाटनांदूर फाट्याजवळ झाला. बीडडकडून नगरकडे जाणार्‍या […]

Continue Reading
acb trap

बीड एसीबीने लाचखोर पकडला!

बीड एसीबीची कारवाई बीड दि. 26 : मोजनीचे हद्द कायम नकाशे व इतर संबधीत कागदपत्रे भुमी अभिलेख कार्यालय येथून प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. यामध्ये फीस भरूनही एक हजार रुपयाची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यकास बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.26) दुपारच्या सुमारास करण्यात आली. मुबारक बशिर शेख (वय […]

Continue Reading