एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ

बीड

केंद्र सरकारकडून झेड दर्जाची सुरक्षा

मुंबई : महाराष्ट्रातला राजकीय विरोध लक्षात घेऊन शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासह विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केल्यानंतर शिवसैनिकांना बंडखोर आमदारांच्या मार्गात येऊ नका, शब्दात शांत राहण्याचे आवाहन केले होते. तरीही ठिकठिकाणी शिवसैनिक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. नुकतेच एकनाथ शिंदे यांनी गोव्याहून मुंबईकडे प्रयाण केले आहे. महाराष्ट्रातला राजकीय विरोध लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

Tagged