रत्नाकर शिंदे शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख!

अंबाजोगाई केज धारूर न्यूज ऑफ द डे परळी बीड माजलगाव वडवणी


बीड दि.22 : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आप्पासाहेब जाधव यांनी महाप्रबोधन यात्रा सभेच्या स्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांना मारहाण केली होती. तसा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर तडकाफडकी जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, आता नवे जिल्हा प्रमुख म्हणून रत्नाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे या जो पैसे देईल त्यांना पद वाटत सुटल्या होत्या. माझं पद देखील त्या विकायला निघाल्या आहेत. आम्ही इथे जिल्हाप्रमुख आहोत. त्यामुळे आम्हाला विचारात घेऊन पद द्या असे मी त्यांना सांगत होतो. त्यावेळी गणेश वरेकर आणि माझ्यात बाचाबाची झाली. यात मी सुषमा अंधारे यांना देखील दोन चापटा लगावल्या’ असा व्हिडिओ अप्पासाहेब जाधव यांनी जारी केला होता. त्यांनतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तडकाफडकी अप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केली. आता नवे जिल्हाप्रमुख म्हणून केजचे रत्नाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे कार्यक्षेत्र केज, अंबाजोगाई, परळी, वडवणी, धारूर, माजलगाव असेल असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आले आहे.

Tagged