tiktok

राजकिय पक्षाचा केला अश्लिल टिकटॉक ;परळीत तरुणावर गुन्हा

क्राईम बीड

  बीड : एका राजकिय पक्षाबद्दल अपशब्द वापरुन टिकटॉक व्हिडीओ केल्याप्रकरणी एका तरुणावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव केशव मुंडे (रा.टोकवाडी, ता.परळी) असे आरोपीचे नाव आहे. गौतम सुधाकर साळवे हे वंचित बहुजन आघाडीचे परळी तालुका महासचिव आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वैभव मुंडे याने वंचित बहुजन आघाडी या पक्षाबद्दल अपशब्द वापरुन माझी व पक्षाचा मानसन्मान व प्रतिष्ठेला धक्का बसेल तसेच एखाद्या स्त्रीला लज्जा वाटेल असा व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड केला आहे. म्हणून या प्रकरणी वैभव मुंडेवर परळी ग्रामीण पोलीसात कलम 180/2020 कलम 294, 509 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.केकान करत आहेत.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged