chori, gharfodi

तेलगाव येथे मध्यरात्री जबरी चोरी!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


महिलांना मारहाण करत तीन लाखाचा मुद्देमाल लंपास

धारूर: महिलांना बेदम मारहाण करत शास्त्राचा धाक दाखवून अंगावरील दागिन्यासह रोख रक्कम असा तीन लाखाचा ऐवज लंपास केला. ही जबरी चोरीची घटना तेलगाव येथील श्रीकृष्ण पार्क येथील रो हाऊसमध्ये गुरुवारी (दि.29) मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

धारुर तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. या घडत असणाऱ्या घटनांचा अद्याप तपास लागलेला नसतानाच तालुक्यातीलच तेलगाव येथील धारूर रोड लगत असणाऱ्या श्रीकृष्ण पार्क येथे रोहाऊस मध्ये राहणाऱ्या लक्ष्मण भानुदास शिंदे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री बारा एकच्या दरम्यान प्रवेश केला. महिला पुरुषांसह कुटुंबियांना मारहाण करत महिलांच्या अंगावरील दागदागिने तसेच घरात ठेवण्यात आलेले दोन लाख रुपये पळविल्याची घटना घडली आहे. या धाडसी चोरीमुळे तेलगाव मध्ये एकच खळबळ उडाली आहे. सदरील घटना समजताच दिंद्रुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनीही घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी दिंदृड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपनिरीक्षक शिंदे यांनी दिली.

Tagged