कुंडलिक खांडे, आधी माझी गाडी फोडून दाखवा!

loksabha election 2024 न्यूज ऑफ द डे बीड राजकारण

रा.काँ.चे युवा नेते अविनाश नाईकवाडे यांचे आव्हान

बीड : ताट भरून जेवायला मिळाल की सगळी पंगत आपणच दिलीये असा गोड गैरसमज कोणाचा तरी झालेला दिसत आहे. आपला खरा चेहरा जिल्ह्यातल्या लहान लेकराला पण परिचित आहे. आपले स्वतःचेच राजकीय अस्तित्व वाचवा जेणेकरून आपली लायकी किती आहे याचं आत्मचिंतन आपल्याला होईल. कुंडलिक खांडे (Kundlik Khande) यांनी आधी माझी गाडी फोडून घ्यायला कुठे घेऊन येऊ सांगावे, असे आव्हान रा.काँ.चे युवा नेते अविनाश नाईकवाडे (Avinash Naikwade) यांनी दिले आहे. शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची रेकॉर्डिंग व्हायरल झाली, त्यात त्यांनी भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना धोका दिल्याची कबुली दिली. याच पार्श्वभूमीवर अविनाश नाईकवाडे यांनी टीकास्त्र डागले आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, गेल्या ५-७ वर्षात जिल्ह्यातील सर्व पक्षातील पक्षप्रमुख म्हणून पुढे आले आहेत की आता निवडलेले जिल्ह्याप्रमुख कुठलाही जनसंपर्क नसताना, सामाजिक काम नसताना फक्त पैशाचा माजावर जर असले पक्षाचे जिल्हाप्रमुख होत असतील, उलट वारंवार गुटखा, जुगार, दंगली, सावकारकी धंदे करणारे लोक असे लोक निवडले आहेत. दहशत माजवून आपल्या शहराची व जिल्ह्याची जी भयावह परिस्थिती झाली आहे त्यास सर्वस्वी जबाबदार हेच लोक आहेत. आणि कुंडलिक खांडे यांनी धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याची भाषा जर करत असेल तर त्याना माझ आव्हान आहे की आगोदर तुम्ही सांगा कधी, कुठे गाड्या घेऊन पोचायचे? अगोदर माझी गाडी फोडून दाखवा त्यानंतर महाराष्ट्राच्या युवकांच्या हृदयातील नेत्याकडे नजर वर करायची हिंमत करावी. मी बीड जिल्ह्यातील तमाम जनतेला आवाहन करतो की, आजच्या क्लिपमधून खांडे यांनी ओबीसी आणि मराठा दोनही समाजाचे मते मिळवण्याचा जो प्लॅन व्यक्त केला आहे, तो भयानक आहे. सर्व जातींचा सोयीने हे लोक केवळ स्वार्थासाठी वापर करतात. ज्यांच्या ताटात खातात त्यांच्याच सोबत रात्रीच्या अंधारात गद्दारी करतात. अशा लोकांना ओळखा यांना प्रतिनिधी बनायचे स्वप्न का आहेत? यांची आकांक्षा कशी आहे सगळं स्पष्ट दिसत आहे. वारंवार आपण तेच पाहिले देखील आहे अन्यथा आपल्याला व पुढच्या पिढीला याचे परिणाम भोगावे लागतील. पक्षाच्या पक्षश्रेष्ठीनी याच्या गळ्यातील पट्टा आवळावा. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करतो की, आपल्या पक्षातील असे नासके लोक आवरा. आपण स्व.बाळासाहेब ठाकरे व स्व.आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे वारस आहात, आपल्या पक्षातील असली घाण तातडीने टाका; जेणेकरून याला समजेल की सूर्यावर थुंकायचा कितीही प्रयत्न केला तरी थुंकी स्वतःवरच पडते, असेही अविनाश नाईकवाडे यांनी म्हटले आहे.

Tagged