पंकजाताई मुंडे यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर

loksabha election 2024 न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र महिला राजकारण

अखेर समर्थकांच्या मागणीची भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून दखल

बीड : बीड लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमधून होत होती. अखेर या मागणीची दखल पक्षश्रेष्ठीकडून घेण्यात आली असून आता पंकजाताई मुंडे यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

बीड लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर जिल्ह्यासह राज्यभरातील समर्थकांमधून त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची मागणी केली जात होती. त्यांच्या पराभवानंतर काही समर्थकांनी आत्महत्या देखील केल्या. याची दखल घेऊन भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या पराभवाची कारणे देखील शोधण्याचा प्रयत्न केला. अशातच आता पक्षश्रेष्ठींनी विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता त्या राज्यसभेवर जाऊन केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चांना देखील पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, त्यांची विधानपरिषदेवर वर्णी जवळपास निश्चित झाली आहे.

Tagged