dhoot

व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्यावर गुन्हा

देश विदेश न्यूज ऑफ द डे

मुंबई : व्हिडिओकॉन कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाल धूत यांच्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे. आफ्रिका खंडातील देश मोझांबिक मधील गॅस, इंधन साठ्याच्या अधिग्रहणात अनियमितता आढळून आल्याने धूत यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवत कारवाईचे पाऊल उचलण्यात आले असल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडून याबाबत तक्रार आली होती. त्या तक्रारीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर धूत यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे. भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील एका वित्तीय गटाची गैरमार्गाने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप धूत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआय, आयडीबीआय आणि आयसीआयसीआय या बँकांनी विक्री मूल्य म्हणून 650 दशलक्ष डॉलर्स ऐवजी 705.45 दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला अदा केली होती. ही रक्कम धूत यांच्याकडून येणे बाकी आहे. दरम्यान, आयसीआयआय-व्हिडिओकॉन प्रकरणात ईडीने व्हिडिओकॉनच्या मुंबई व औरंगाबाद येथील काही ठिकाणांवर छापे टाकले होते. याप्रकरणी वेणुगोपाल धूत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनी लाँडरिंग प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर यांच्यासह ईडीने धूत यांचीही चौकशी केली होती. आयसीआयसीआय बँकेकडून व्हिडिओकॉन समूहाला 1875 कोटींचं कर्ज मंजूर करताना त्यात भष्टाचार झाल्याचा तसेच अनियमितता असल्याचाही आरोप आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावरच ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे.

Tagged