pankaja munde

पंकजा मुंडेंना डावलून खा.प्रीतम मुंडेंकडे दिली पक्षाची जबाबदारी

न्यूज ऑफ द डे बीड राजकारण

बीड, दि.3 : भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाच्या कार्यकारिणीत मोठी जबाबदारी दिली जाईल, असे सांगितले जात होते. मात्र आज अचानक पक्षाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र देत पंकजा मुंडे यांना डावलून त्यांच्या बहीण खा.डॉ.प्रीतम मुंडे यांच्याकडे पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

खा.प्रीतम मुंडे यांच्याबरोबरच प्रदेश उपाध्यक्ष म्हणून राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हळवणकर, चित्रा वाघ, प्रसाद लाड, भारती पवार, जयप्रकाश ठाकूर यांचीही निवड करण्यात आली आहे. ही घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पंकजा मुंडे यांना केंद्रीय कार्यकारिणीत मोठी जबाबदारी मिळणार आहे. विधानसभेत मुख्य प्रतोद हे आशिष शेलार, माधुरी मिसाळ असतील असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. भाजपाचे मुख्य प्रवक्ते म्हणून केशव उपाध्येंना जबाबदारी दिल्याचंही त्यांनी जाहीर केलं. तर महामंत्री म्हणून महामंत्री सुजितसिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

खा.शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात

रात्रीतून सरकार स्थापण्याचा निर्णय चुकलाच : देवेंद्र फडणवीस

बीडमध्ये आ.संदीप क्षीरसागर यांच्या घरापुढे आंदोलन

Tagged