गोली का जवाब गोलीसे! विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार

क्राईम देश विदेश न्यूज ऑफ द डे

कानपूर : कानपूर पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गँगस्टर विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या एसटीएफच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. मध्य प्रदेशातून अटक केलेला गँगस्टर विकास दुबेला घेऊन हा ताफा कानपूरला जात होता. ही घटना बर्रा पोलिस स्टेशन परिसरात घडली. या अपघातादरम्यान विकास ज्या गाडीत बसला होती ती कार उलटी झाली. यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विकास दुबेचा एन्काउंटर केला आहे. गोली का जवाब गोलीसे असे म्हणत पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे समर्थन केले जात आहे.

अपघाताचा फायदा घेऊन जखमी झालेला विकास दुबे एसटीएफ पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जाण्याच्याा प्रयत्नात होता. कार उलटल्यानंतर विकास दुबे फरार झाला मात्र बाजूला असलेल्या शेतात पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं. यावेळी विकासने गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही बचावात्मक गोळीबार सुरू केला. विकासला सरेंडर करण्याच्या सूचना देण्यात आल्या मात्र त्यानं गोळीबार सुरू ठेवल्याा. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाला आहे.

विकास दुबेला चार गोळ्या लागल्या गंभीर अवस्थेत असलेल्या विकासला तातडीनं स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान गाडीला झालेल्या अपघातात रामाकांत पचुरी,पंकज सिंह, अनूप कुमार, प्रदीप पोलीस जखमी झाले आहेत.

Tagged