बीडमधील बँका शनिवारी, रविवारीही सुरु राहणार

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेले व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी पुढील दि.11 व 12 रोजीच्या शासकीय सुट्या रद्द करण्यात येत असून शहरातील सर्व बँका सुरु राहणार आहेत.

शहरात आठ दिवसांसाठी लॉकडाऊन होते. ते गुरुवारी शिथिल करण्यात आले आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे नागरिकांचे बँकेतील व्यवहार, शेतकर्‍यांची पीक कर्ज आदी प्रकरणे प्रलंबित राहिले आहेत. ते सुरळीत व्हावेत यासाठी शासकीय सुट्या रद्द करुन पुढील दोन दिवस बँका सुरु राहणार असल्याची माहिती बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. दरम्यान, या निर्णयामुळे शेतकरी, बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Tagged