परळीचा लॉकडाऊन २ दिवसांसाठी वाढवला

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे परळी

बीड : परळी शहराचा लॉकडाऊन आणखी 2 दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ही माहिती दिली आहे.

  यापूर्वीच्या आदेशान्वये परळी शहर आठ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु दरदिवशी शहरात रुग्ण आढळून येत आहेत. याशिवाय आजच्या अहवालात परळीतील एसबीआय शाखेतील बाधितांच्या संपर्कातून चौघे पॉझिटिव्ह आल्याने व काल घेतलेला सर्व स्वॅबचे अहवाल आणखी प्राप्त झाले नसल्याने लॉकडाऊन वाढविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

Tagged