GEVRAI

गेवराई शहर पुढील आठदिवसासाठी बंद

कोरोना अपडेट गेवराई

बीड – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे गेवराई शहरात पुढील आठ दिवसांसाठी म्हणजेच 6 ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत
गेवराई शहरात दररोज नव्याने रुग्ण आढळून येत आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे अवघड झाल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. बंदबाबतचे यापुर्वीचे सर्व नियमही गेवराई शहरासाठी लागू करण्यात आले आहेत.