LAL PARI ST

गणपती बाप्पा मोरया… लालपरी सुरू करण्यास हिरवा कंदील

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

मुंबई : कोरोनाच्या साडेचार महिन्यानंतर सार्वजनिक वाहतुकी संदर्भात नागरीकांना मोठी खुशखबर मिळाली आहे. लालपरी आता सुरु करण्यात येत असून त्यामाध्यमातून जिल्ह्याबाहेर विनापास प्रवास करता येणार आहे. मात्र खासगी वाहनातून प्रवास करण्यासाठी अजुनही ईपास बंधनकारक ठेवण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेतही दिली.


राज्य सरकाने आज मिशन बिगेन अंतर्गत एक परिपत्रक प्रसिध्दीस दिले आहेत. त्यात राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देत असल्याचे सांगण्यात आले. यापुर्वीच जिल्हांतर्गत प्रवासासाठी लालपरी धावत होती. मात्र प्रवाशीच नसल्याने लालपरी तोट्यात जाऊ लागल्याने ती पुन्हा बंद करण्यात आली. आता बसमधून प्रवास करण्यासाठी ई-पासची अजिबात आवश्यकता असणार नाही. परंतु असा प्रवास करण्यासाठी नागरिकांना आगोदर आरक्षण करावं लागणार आहे. त्यामुळे नागरिक ईपासची भानगड टाळण्यासाठी एसटीची मोठ्या प्रमाणावर वापर करण्याची शक्यता आहे. त्यामाध्यमातून सरकार महामंडळाचं उत्पन्न वाढविणार असे दिसत आहे. पण राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

आणखी काय आहेत नियम ?
1) कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी क्वारंटाईन होणं बंधनकारक असणार आहे. पण क्वारंटाईनचा कालावधी 14 दिवसांऐवजी 10 दिवस करण्यात आलाय.
2) क्वारंटाईन पाळण्यासाठी प्रवाशांना 12 ऑगस्टपर्यंत कोकणात पोहोचणं गरजेचं आहे.
3) एसटी बसने प्रवास करणार्‍या प्रवाशांना ई-पासची आवश्यकता नाही. पण खासगी वाहनाने प्रवास करणार असाल तर ई-पास असणे बंधनकारक आहे.
4) एसटीची विशेष सेवाही सुरू करण्यात आली आहे. कोकणात जाण्यासाठी 22 प्रवाशांना एकत्र बुकिंगही करता येणार आहे. ही विशेष एसटी थेट संबंधित प्रवाश्यांच्या गावापर्यंत सेवा देईल.
5) 4 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजल्यापासून एसटी बुकिंग सुरू करण्यात आलं आहे.
6) खासगी बसला एसटी बसपेक्षा केवळ दीडपट अधिक भाडे घेता येणार आहे. त्याबाबत जर प्रवाशांच्या तक्रारी आल्या तर कारवाई केली जाईल, असं आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलंय.
7) ज्या चाकरमान्यांना 12 ऑगस्टपर्यंत कोकणातील आपल्या गावी पोहचता येणार नाही त्यांना पुढे 48 तासांत कोरोना टेस्ट करावी लागणार आहे.

Tagged