पत्रकारांच्या प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्त्याचा लढा

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : समाजाच्या कामी येणार्‍या आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ (समाज म्हणतो) मानल्या जाणार्‍या पत्रकारांच्या प्रश्नावर लढा देताना पत्रकारांव्यतिरिक्त अन्य कोणी दिसून येत नाही. मात्र बीड जिल्हा केचरीसमोर पत्रकारांच्या प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी सोमवारी (दि.21) आंदोलन सुरु केले आहे.

डॉ.गणेश ढवळे यांनी आरोग्य राजेश टोपे यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत निवेदन सादर केले. निवेदनात पुढे म्हटले की, कोरोनामुळे मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाख रूपये द्यावेत. पत्रकारांना विमा कवच (घोषणा केलेली आहे अध्यादेश काढावा) द्यावे. कोरोनाबाधित पत्रकारांना व्हेंटिलेटर, ऑक्सीजन आदी अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज रुग्णालयात स्वतंत्र बेडची व्यवस्था करावी. या मागण्यांना कॅबिनेट बैठकीमध्ये मान्यता देण्यात यावी या मागणीसाठी लिंबागणेशचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी आंदोलन सुरु केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते युनूस शेख हे देखील उपस्थित आहेत.

Tagged