आज मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची ठरणार दिशा

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बैठक

नाशिक : नाशिकमध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात झाली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह राज्यभरातील प्रतिनिधी, समन्वयक बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये सर्वानुमते मराठा अरक्षणासाठीची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. 
       आज दिवसभर ही बैठक सुरु राहणार आहे. या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या भावना समजून घेण्यात येणार आहेत. तसेच यावर विचार करुन सर्वानुमते मराठा आरक्षणासाठी होणार्‍या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली. दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी लोकप्रतिनिधींचा ओघ वाढतच आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक संघटनांनी देखील पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. सर्व पक्ष, नेते मंडळी, विविध संघटना यांची मोट बांधून त्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत सत्ताधारी आणि विरोधकांनी सकारात्मकता दाखवली आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी जो लढा उभारला आहे, त्याला लवकर यश मिळावं असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Tagged