उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर कोळगाव परिसरात गुरुवारी (दि.८) रात्रीच्या सुमारास घडला.

अमोल चंदर राठोड (जदीद तांडा जदीद जवळा ता.माजलगाव) असे मयताचे नाव आहे. तो दुचाकीवरून (MH 23 M -2414) जात असताना रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक अंधारात दिसला नाही. भरधाव वेगात ट्रकला (KA-56, 5271) पाठीमागून जोराची धडक दिली. यात अमोलचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस सपोनि.प्रविणकुमार बांगर,पोह.सोनवणे, घुगे, रुपनर, मिसाळ व चकलंबा पोलिस ठाण्याचे पोउपनि.डीगंबर पवार, ओव्हाळ, डोंगरे, खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेत. मृतदेह रुग्णालयात पाठवला.

Tagged