areested

अनैतिक संबंधातून ‘त्या’ महिलेचा खून

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

दोघांना पोलीसांनी केले गजाआड

केज : तालुक्यातील साळेगाव येथे शेतात कापूस वेचणार्‍या 24 वर्षीय महिलेचा गळा आवळून व दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या घटनेला वेगळेच वळण मिळाले असून अनैतिक संबधातून हा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी दोघांना पोलीसांनी गजाआड केले आहे.
पंकज भगवान जाधव, धनंजय उर्फ अजय दत्ता इंगळे अशी आरोपीचे नावे आहेत. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, पंकज जाधव यांच्या शेतात मयत महिला ही कामासाठी गेली होती. यावेळी तिच्याशी पंकजने शरीर संबंध केला. त्यानंतर त्याने मित्र धनंजय उर्फ अजय दत्ता इंगळे यास फोन करून बोलावून घेतले. त्यानेही मयत महिलेशी शरीर सुखाची मागणी केली. मात्र त्या महिलेने त्यास नकार दिला व घडल्या प्रकाराची माहिती माझ्या पतीस सांगते व पोलिसात तक्रार देते, अशी धमकी दिली. या धमकिमुळे दोघांनी तिच्या हातावर मार देऊन तीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर धनंजय उर्फ अजय दत्ता इंगळे याने तिला ओढत नेऊन कापसाच्या शेतात तिच्यावर बलात्कार केला. झालेला प्रकार घरी माहित होईल किंवा पोलिसात तक्रार होईल. म्हणून दोघांनी मिळून त्या महिलेचा स्कार्फने गळा आवळून आणि नंतर डोक्यात दगड घालून खून केला. खून केल्यानंतर दोघांनी प्रेत उचलून सुमारे पन्नास फूट अंतरावर कापसाच्या शेतात नेऊन टाकले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील, केजचे पोनि.प्रदीप त्रिभुवन, सपोनि.संतोष मिसळे, उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलीस उपनिरक्षक दादासाहेब सिद्धे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील तपासणी पथक, आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. लातूर येथील श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी मिळालेल्या मोबाईलवरुन आरोपींचा पोलीसांना सुगावा लागला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे करीत आहेत.

Tagged