पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

गेवराई : पोहण्यासाठी गोदावरी नदीपात्रात गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.7) सकाळी राक्षसभुवन येथे घडली. मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
अविनाश जगदीश नाटकर (वय 18 रा.राक्षसभुवन ता.गेवराई) असे मयताचे नाव आहे. तो शनिवारी (दि.7) सकाळी राक्षसभुवन येथील गोदावरी नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्या सोबत आणखी काही मुलेही होती. पंरतु जास्त पोहता येत नसल्यामुळे अविनाशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याची माहिती चकलांबा पोलीसाना मिळताच पोलीस उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंर्जुेडे यांच्यासह पोलीस, बीड नपचे अग्नीशमन पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी एक वाजता मृतदेह पाण्यात आढळून आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tagged