बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पिता-पुत्र ठार

क्राईम न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

अपेगवतील घटनेने शेतकरी दहशतीखाली

पैठण, (चंद्रकांत अंबिलवादे)

दि.17- पैठण तालुक्यांमध्ये गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने एकच धुमाकूळ घातला असून शेती वस्तीवर काम करण्यासाठी मोल मजूर व शेतकऱ्यांना दहशतीखाली काम करावे लागत असतानाच सोमवारी रात्री पैठण तालुक्यातील आपेगाव परिसरातील शेतामध्ये काम करणारे पिता पुत्रावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने यामध्ये पिता-पुत्र ठार झाल्याची घटना घडले आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये एकच खळबळ उडाली आहे रात्री दोन वाजता हे दोन्ही मृतदेह पैठण पोलिसांनी आपेगाव चे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश औटे, दीपक मोरे व ग्रामस्थांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या पंचवीस कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत शर्यतीचा प्रयत्न सुरू करण्यात आला असून आपेगाव परिसरात वन विभागाने पिंजरा लावला आहे. या घटनेचा वन विभागामार्फत पंचनामा करण्यात आला असून मयतावर अंत्यसंस्कार व नातेवाईकांना योग्य मदत शासनाच्या निर्णयानुसार करण्यात येईल अशी माहिती जिल्हा वनपाल बी एस तांबे, तालुका वनपाल मनोज कांबळे यांनी दैनिक कार्यारंभ शी बोलताना दिली.
अधिक माहिती अशी की पैठण तालुक्यातील पाचोड परिसरातील विविध गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार गेल्या आठ दिवसापासून सुरु असल्याची चर्चा परिसरात होती. काही शेतकऱ्यांनी या बिबट्याला प्रत्यक्ष बघितल्याचे ही सांगितले. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठ दिवसापासून बिबट्याची अयशस्वी शोध मोहीम हाती घेतली होती. सोमवारी रात्री शेतामध्ये उशिरा काम करीत असलेल्या पिता-पुत्र अशोक मखाराम औटे वय ५० व मुलगा कृष्णा अशोक औटे वय २५ या दोघांवर बिबट्याने अचानक हल्ला करून त्यांच्या शरीराचे लचके तोडले. या हल्ल्यात पितापुत्र जागीच ठार झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आपेगाव तसेच परिसरातील गावामध्ये एकच दहशत निर्माण झली.

घटनेची माहिती मिळताच पैठण उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक छोटू सिंग गिरासे, रामकृष्ण सागडे,पो काॅ सुधीर ओहोळ, माळी, दुल्लत इत्यादी पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती जिल्हा वन विभागाला कळविले. त्यानुसार जिल्हा वनपाल बी एस तांबे, तालुका वनपाल मनोज कांबळे यांनी पंचवीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ आपेगाव येथे येऊन पंचनामा करून बिबट्या ला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला आहे .

पाचोड परिसरात बिबट्याचा धुमाकूळ …
दरम्यान पैठण तालुक्यातील पाचोड परिसरातील थेरगाव परिसरामध्ये काही दिवसापूर्वी असाच बिबट्या धुमाकूळ घालीत असताना ग्रामस्थांच्या मदतीने जेरबंद केले होते. मात्र यावेळी हाा बिबट्या छातीवर बसून यावेळी अनेक पोलिस अधिकारी व गावकऱ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये सेल्फी घेतल्या घेऊन सोशल मीडियावर हाऊस पूर्ण करून घेतली होती. परंतु बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मदत करणाऱ्या ग्रामस्थांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल होत असल्याने या प्रकरणामुळे कोणीही पुढे येत नसल्याचा प्रकार पडत आहे. थेरगाव पकडलेल्या बिबट्याला जखमी अवस्थेत औरंगाबादला उपचारासाठी नेले होते चार दिवसांनी त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. बिबट्याच्या छातीवर बसल्यामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिल्यामुळे याप्रकरणी काही ग्रामस्थ वर गुन्हा दाखल करण्यात आले होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आपेगाव येथील घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड निर्माण झाली असून शेतीचे काम करणे अवघड झाले आहे.

Tagged